Marathi Prarthna Paper
प्रार्थना पेपर
|| श्री गणेशाय नमः ||
|| आई श्री आशापुराजी सत्य आहे ||
1) आपल्या सर्वांच्या जीवनात अनेक समस्या असतात ज्यांचे समाधान आपल्या जवळ नसते. जर तुम्ही कुठल्याही ज्योतिष, बुआ, किंवा एखादया श्रीक्षेत्र स्थानी आपल्या समस्या विचारायला गेला असाल, तिथून तुम्हाला एखादी वस्तू जसे की यंत्र, लिंबू, धागा, कुंकू,रुद्राक्ष, भस्म ,श्रीफळ, धान्याचे दाणे किंवा अजून काही वस्तू दिल्या असतील तर या सर्व वस्तू एकत्र करून नमस्कार करावा आणि प्रार्थना करून
म्हणावे: “तुम्ही सर्व शक्तिमान आहात, आमच्याकडून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर क्षमा करा. आजपासून आम्ही तुम्हाला बंधन मुक्त करत आहोत आणि आम्ही स्वतः ही मुक्त होत आहोत. आपण दिलेल्या वस्तूंचे आम्ही विसर्जन करत आहोत, कारण आम्ही आमची प्रत्येक कार्ये कुलदेवी / कुलदेवतांना सोपवत आहोत. आपण आम्हाला आशीर्वाद दयावा की आमच्या प्रत्येक कार्यात यश मिळो.” अशा प्रकारे प्रार्थना म्हणून सर्व वस्तूंचे वाहत्या पाण्यात विसर्जन करावे किंवा तिथे ठेवलेल्या निर्माल्य कलशात विसर्जन करू शकता. (भस्म, कुंकू, धान्याचे दाणे किंवा धागा तुम्ही कोणत्याही झाडाच्या खोडा जवळ मातीत विसर्जन करू / ठेवू शकता.)
२) घर देव्हाऱ्याची रचना:
घराच्या देव्हाऱ्यात लाल कापडाचे आसन ठेवावे. देव्हाऱ्याच्या मध्यभागी कुलदेवी माताजी / कुलदेवता यांची तसबीर किंवा मूर्ती विराजमान करावी. माताजींच्या उजव्या हाताला म्हणजे आपण देव्हाऱ्या समोर उभे असाल तर डाव्या बाजूला गणपतीबाप्पांना विराजमान करावे. नंतर गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला आणि कुलदेवी मातेच्या डाव्या बाजूला तुम्ही अन्य देवांची किंवा माताजींची तस्बीर किंवा मूर्ती विराजमान करू शकता परंतु ती एकाच रांगेत (ओळीत) ठेवावी, पुढे किंवा मागे, वर किंवा खाली ठेवू नये.
देवांचे किंवा माताजींचे एक एक च स्वरूप ठेवावे. अतिरिक्त स्वरूप घरात कुठेही ठेवता येतात. घर देव्हाऱ्यात कुलदेवी माताजींना ओढणी आणि छत्र लावावे.
घरातील देव्हाऱ्यात पूर्वजांची किंवा गुरूंची तसबीर ठेवू नये.
निरंजन आणि उदबत्ती लावण्याची योग्य पद्धत:
घर देव्हाऱ्यात निरंजन डाव्या हाता कडे लावावे आणि उदबत्ती उजव्या हाता कडे लावावी.
३) सर्व प्रथम घर देव्हाऱ्यात गणपतीला निरंजन आणि उदबत्ती लावावी आणि दुसरे कुलदेवी / कुलदेवतेला लावून प्रार्थना करावी :“हे गणपतीबाप्पा , हे विघ्नहर्ता मी, माझ्या पति/पत्नीवर, माझ्या मुलांवर आणि कुटुंबावरील जे काही करणी , बंधन, वशीकरण, ग्रहपीडा , कर्मपीडा , पितृपीडा सारखे कुठलेही विघ्न असेल तर आपण दूर करावे.”
४) “हे कुलदेवी /कुलदेवता, आपल्या कुळाचे रक्षण करणे आपल्या हातात आहे. आम्ही आपली मुले आहोत. आमच्या डोक्यावर केस आहेत, तितक्या चुका आमच्या हातून घडतात , तर आपण आम्हाला क्षमा करावी. आपण अंतर्यामी आहात, आपल्या कुळाची कुठलीही अडचण असेल ती आपण दूर करावी. आमची मनोकामना पूर्ण करावी आणि आम्हाला सत्याचा मार्ग दाखवावा.”
५) त्या नंतर माताजीं समोर पाणी भरून एक पात्र ठेवावे आणि प्रार्थना करावी: “हे, मां कुलदेवी/कुलदेवता,आपल्या समोर पाण्याने भरलेले पात्र ठेवले आहे, त्यात आमच्यासाठी औषध तयार करा. कोणा साठी काय करायचे आहे ते आपण जाणता”. त्या नंतर घरच्या सगळ्या सदस्यांनी हे प्रसाद रुपी पाणी ग्रहण करावे.
६) कुलदेवी / कुलदेवतेला प्रार्थना करावी, “आमच्या पितृ माता–पितांच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष दयावा आणि आपल्या शरणात घ्यावे.”
त्या नंतर फक्त एकच दिवस आपल्या पाणवठ्या जवळ (स्वयंपाक घरात जिथे पिण्याचे पाणी ठेवतो ती जागा) दिवा आणि उदबत्ती लावावी. (घरातील गृहिणीने डोक्यावर पदर घेऊन) नमस्कार करून प्रार्थना करावी की “हे पितृ माता-पिता, आपली जी काही इच्छा असेल ती आम्ही पूर्ण करू आणि आपल्याला दुधाने तृप्त करू. आपल्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळो यासाठी आपण आपल्या कुलदेवी / कुलदेवतेला शरण जावा आणि आशीर्वाद दया कि आम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळो.”
जय माताजी